समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्र | Maruti Stotra in Marathi
या लेखात आपण समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्र वाचणार आहोत. जर तुम्हीही श्री हनुमानाचे परम भक्त असाल तर नक्की वाचा…
श्री हनुमान यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त, सेवक मानले जाते. हनुमान यांना हिंदू धर्मात खूपच पवित्र मानले गेले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी मारुती स्तोत्र (Maruti Stotra Lyrics in
Marathi) मराठी भाषेत रचले आहे. समर्थ रामदास स्वामी हे श्री हनुमानाचे मोठे भक्त होते. त्यांनी विविध ठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापनादेखील केली आहे.
मारुती स्तोत्र हे स्तुती श्लोकांचे संकलन आहे जे श्री हनुमान यांचे वर्णन करतात.
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||1||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||2||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||3||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||4||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||5||
ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||6||
पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||7||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||8||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||9||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||10||
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||11||
ब्रह्मांडाभोवतें
वेढें, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||12||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||13||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें
करूनियां ||14||
भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||15||
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||16||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||17||
|| इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ||
!!! बजरंग बली कि जय !!!
मारुती स्तोत्र जप पद्धत
·
मारुती स्तोत्राचे पठण हे सकाळी किंवा सायंकाळी पूजा करताना करावे.
·
हनुमानजींच्या
मूर्तीसमोर बसावे.
·
हनुमानजींची विधिवत पूजा करुन पठण सुरु करावे.
·
पठण करताना चित्त हे एकाग्र असावे.
·
एका स्वरात, लयबद्ध पद्धतीने पठण करावे.
मारुती स्तोत्र पठणाचे फायदे
·
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने भगवान हनुमान आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात.
·
जीवनात धन-धान्याची वृद्धी होते.
·
साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.
·
घरात सकारात्मक ऊर्जा वाहते.
·
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने श्री हनुमान प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात.
·
भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते.
·
मारुती स्तोत्राच्या पठणामुळे जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती येते.
·
भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात.
·
मारुती स्तोत्राच्या पठणामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते.
टीप – वरील फायदे हे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, तसेच हे पूर्णतः व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून आहेत.
समारोप
तर मित्रांनो, हे होते समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्र. आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी उपलब्धकरून दिलेले समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्र आपल्या नक्की उपयोगी पडेल. आम्हाला खात्री आहे की आपण दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. आपल्या जवळच्या व्यक्तीशी ही माहिती अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. जर तुमच्याकडे अजून काही अशा प्रकारची माहिती असेल तर कृपया येथे कमेंट करा. आम्ही ती माहिती नक्कीच अपडेट करू.
अशाच प्रकारच्या माहिती आणि लेखांसाठी वेळोवेळी www.Marathivichar.online या ब्लॉगला भेट द्या. आपला अनुभव आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे ब्लॉगला आवर्जून भेट द्या आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा.